June 28, 2025 8:21 pm

साधनाताई स्वरूप वाघमोडे यांना माळेगावची उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे…

अपनी भाषा में पढ़े! Translate

साधनाताई स्वरूप वाघमोडे यांना माळेगावची उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे…
.
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते स्व.स्वरुपभैय्या वाघमोडे यांच्या पत्नी साधनाताई वाघमोडे यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यामध्ये प्रामुख्याने साधनाताई स्वरूप वाघमोडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
साधनाताई या स्व.स्वरुपभैय्या वाघमोडे यांच्या पत्नी आहेत.स्व.स्वरुपभैय्या वाघमोडे यांचे सामाजिक व राजकीय कार्य फार मोठे आहे.त्यांचे राष्ट्रवादी पक्षासाठी मोलाचे कार्य केले आहे.त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
त्यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून साधनाताई या सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर आहेत.
आता पर्यंत राष्ट्रवादी पक्षाने कारखान्याच्या संचालक पदासाठी गोफणे,बुरुंगले,येळे या आडनावाच्या लोकांना संधी दिली आहे.मात्र बहुसंख्येने असलेल्या वाघमोडे यांना संधी मिळाली नाही.
तरी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने स्व.स्वरुपभैय्या वाघमोडे यांचे कार्य पहाता त्यांचा वारसा चालवणाऱ्या साधनाताई वाघमोडे यांना माळेगावची उमेदवारी मिळणे गरजेचे आहे.त्यांना जर संचालक पदाची संधी मिळाली तर ती स्व. स्वरुप भैय्या वाघमोडे यांना खरी आदरांजली ठरेल.
यामुळे साधनाताई वाघमोडे यांना माळेगावची उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!