चोपडा: अमळनेरचा अस्लम अलीचा अल्पवयीन मुलीला फुसवून पळवण्याचा प्रयत्न; हिंदू कार्यकर्त्यांनी अडवून पोलिसांच्या दिले ताब्यात
मार्मिक न्यूज नेटवर्क :
अमळनेरच्या सराफ बाजार भागातील (रऊफ बँड चा मालक) अस्लम अली युसूफ अली सय्यद (वय 29) याने चोपडा तालुका येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून चोपडा उपजिल्हा रुग्णालया जवळ बोलऊन तिला पळवण्याचा प्रयत्नात असताना अस्लम अली युसूफ अली सय्यद याल काही हिंदू कार्यकर्त्यांनी अडवून पोलिसाच्या दिले ताब्यात.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी रउफ बँड लग्नाच्या कार्यक्रमासाठी धानोरा येथे गेलेल्या अस्लम अलीने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून भुरळ घातली. त्यानंतर त्याने तिला मोबाइल नंबर देऊन व्हाट्सअँप, आणि इंस्टाग्राम वर संपर्क साधत. त्याने काही दिवसांनी जवळीक केली.
अस्लम अलीला तीन अपत्य असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
बायकोसह त्याचा संबंध तुटला आहे. मात्र पीडितेला अविवाहित असल्याचे सांगून तिच्यावर वारंवार अत्याचार आरोपी करत होता. त्याने अल्पवयीन पीडितेस विश्वासात घेत किनगावच्या शिवारात शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही उघड झाले.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली की, अस्लम अलीने दि. २३ रोजी सकाळी १० वाजता मुलगी संगणक क्लाससाठी चोपडा येथे गेली असता तिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयाजवळ गाठून तिला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतांना आरोपीचा लग्न लावण्याचा बेत होता असे असतांना हिंदू कार्यकर्त्यांनी त्याचा बेत हाणून पाडला आणि त्यांला पोलिसाच्या ताब्यात दिले.
तर पोलीस कार्यवाहीत त्याचा मोबाईल ची देखील झाड-झडती होणार फोन कॉल हिस्ट्री सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक यावरून असे अजून काही प्रकार समोर येतात की काय असा संशय निर्माण होत आहे.
चोपडा शहर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
चोपडा शहर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अस्लम अलीला चोपडा न्यायालयात उभे केले असता त्याला दि. २८ मे पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे हे करीत आहेत.
गेल्या 30 ते 40 वर्षापासून बँड व्यवसायात असलेले सय्यद यांनी हिंदू मुस्लिम अनेक संप्रदायाच्या लग्नकार्यात आपला बँड वाजवला असून असून ते या व्यवसायात सुपरिचित आहेत या घटनेने त्यांच्या व्यवसायासह नावावर डाग लागला असे म्हणता येईल, परंतु ही घटना हिंदू मुस्लिम म्हणून न बघता आरोपी हा आरोपीच आहे. त्याला पाठीशी घालता कामा नये.
इनुस खान. नागरिक