June 29, 2025 12:03 am

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुक्याची मासिक बैठक यशस्वीरीत्या संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुक्याची मासिक बैठक यशस्वीरीत्या संपन्न

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बारामती | दिनांक २१ मे २०२५ — अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुक्याची मासिक बैठक ‘ऊर्जा भवन’ (विभागीय परिमंडळ कार्यालय), बारामती येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे विषय हाताळले गेले, त्यात राज्य सरकारने घेतलेल्या स्मार्ट मीटर संदर्भातील निर्णयावर सखोल चर्चा झाली. या निर्णयामुळे ग्राहकांच्या हितास बाधा येऊ शकते, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.

महावितरणचे अधीक्षक अभियंता दिपक लहामगे यांच्यासमवेत तालुक्यातील वीज समस्या व स्मार्ट मीटर संदर्भात सविस्तर प्रश्नोत्तरे आणि चर्चा करण्यात आली. यावेळी वीज वितरणातील अडचणी, बिले अचूकपणे मिळणे आणि ग्राहकांच्या तक्रारी यावर उपाययोजना सुचवण्यात आल्या.

या बैठकीस पुणे जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे पाटील, जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी, बारामती तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव, संजीव बोराटे, संघटक सतिश खंडाळे, महिला अध्यक्ष सौ. मंजुश्री तावरे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, कोषाध्यक्ष नानासो तावरे, सचिव महेश पवार, सहसचिव युवराज इंदलकर यांच्यासह सदस्य सचिन चौधर, चेतन मोहीते, नागेश देशमाने, हेमंत खंडाळे, अमोल सोनवणे, धनंजय तावरे शंकर सुर्वे,सौ. पुनम सोनवणे, सौ. वर्षा चव्हाण, दिलीप खंडाळे, विनोद नाझिरकर आदी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी ग्राहकांच्या हितासाठी पुढील कृती आराखडा ठरवण्यात आला आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!