पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवन व कळस नवीन स्थलांतर या इमारतीचे उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते
(निलेश गायकवाड )
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख राज्य सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. कळस (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. नव्या इमारतीमध्ये नव्या साहित्यासह बँकेच्या शाखेचे उद्घाटन व भिगवण येथील नवीन इमारतीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याहस्ते रविवारी (ता. १६) रोजी उद्घाटन सोहळा पार पडला .
उद्घाटनप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक अप्पासाहेब जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, तसेच व्यासपीठावर शामराव वाघ, नंदकुमार पानसरे , संचालक प्रवीण शिंदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित .
भरणे यांनी भिगवन येथील इमारतीचे झालेले कामकाज व इमारतीची पाहणी केली. भरणे यांनी बोलताना सांगितले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यासाठी फायद्याचा विचार न करता ग्रामीण भागात शाखा उघडून शेतकऱ्यांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देणारी बँक आहे. असे प्रतिपादन केले.