June 29, 2025 11:20 am

शहरातील गांधलीपुरा भागात आपल्याला मित्रानां सोडायला गेलेल्या तिघांवर प्राणघातक हल्ला 

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहरातील गांधलीपुरा भागात आपल्याला मित्रानां सोडायला गेलेल्या तिघांवर प्राणघातक हल्ला 

अमळनेर.

हर्षलसिंग नरेंद्रसिंग ठाकुर हा आपला मित्र राजेश खरारे याला धुळ्याला गेला होता. अमळनेर आल्यावर त्यांना त्यांचा मित्र दुर्गेश सोनवणे भेटला. पाऊस चालू असल्याने त्याने दोघांना घरी सोडण्याची विनंती केली. म्हणून गाडीवर त्यानां घेऊन गांधलीपुरा भागात त्याच्या घरी गेले असता गरीब नवाब चौकात सलमान खान रफा, आकीबअली सैय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक, एजाज पठाण यांनी मोटरसायकल आडऊन राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे याना मागे ओढून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले.तर सलमान रफा याने हातातील विट व लोखंडी सळई मारून मोटरसायकलवरून खाली पाडले. अन लाथा बुक्क्यांनी मारून अश्लील शिवीगाळ करू लागले. यावेळी राजेशची आई रजनी खरारे व बहीण लक्ष्मी भांडण सोडवण्यास आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या संदर्भात अमळनेर पोलीस स्टेशनला पाचही आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!