June 29, 2025 4:31 pm

सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्या – अमर पवार

अपनी भाषा में पढ़े! Translate

सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्या – अमर पवार

रयत क्रांती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांची मागणी

प्रतिनिधी -अजिनाथ कनिचे
सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी करत पुढे बोलले की,रयत क्रांती संघटनेचे व रयत क्रांती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपबरोबर खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे राजकारण समाजकारण करीत आहेत.यामुळे खोत यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारवाढीत मंत्रिपद मिळावे अशी रयत क्रांती पक्षाच्या व कार्यकर्त्यांची भावना आहे.

रयत क्रांती पक्षाचे व रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत हे कसलीही अपेक्षा न करता भाजप व मित्र पक्षाबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.सध्या भाजप व मित्र पक्षाचे राज्यात व केंद्रात सरकार आहे.असे असलेतरी सदाभाऊ खोत हे गेल्या पाच वर्षापासून लाभाच्या सर्व पदापासून वंचित आहेत.यामुळे कार्यकर्त्यांत मरगळ पसरली आहे.कार्यकर्त्यांत सर्वत्र निराशेची भावना आहे.सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार जास्तीत मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते.यासाठी त्यांनी दोन-तीन महिने स्वतःची सर्व कामे बाजूला ठेवुन केले आहे.यामुळे खोत यांचे योगदान नजरेआड करण्यासारखे नाही. तरी सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!