June 29, 2025 11:17 am

अमळनेर शहरा सह तालुक्यात चोरीचे सत्र थांबेना

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहरा सह तालुक्यात चोरीचे सत्र थांबेना.

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहरा सह तालुक्यात चोरीचे सत्र थांबेना दोन दिवसांपूर्वी शहरात चार दुकाने फोडण्यात आली होती. त्यांनतर धुपी, मुंदडा नगर व विद्यानगर भागात चोरट्यानी चार घरे फोडली आहेत. यात तालुक्यातील धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी शेतातली कपाशी, दादर आणि हरभरा विकून आलेले पाच लाख रुपये आठवडाभरापूर्वी कपाटात ठेवून ७ रोजी नाशिक येथे निघून गेले होते. ११ रोजी सायंकाळी ६ वाजता भागवत जाधव यांनी फोन करून कळवले की घराचा मागील दरवाजा उघडा आहे. म्हणून सुभाष जाधव हे १२ रोजी सकाळी १० वाजता आले असता घराच्या दरवाज्याच्या कडी कोंडा कुलूप तोडलेले आढळून आले. घरातील सामान अस्तव्यस्त पडलेला होता. कपाटातील पाच लाख रुपये दिसून आले नाहीत. म्हणून सुभाष जाधव

यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यांसाहेब देशमुख करीत आहेत.

सध्या अमळनेर शहर व तालुक्यात चोरट्यानी धुमाकूळ घातलाय. शहरातील चार दुकाने , आणि बऱ्याच ठिकाणी घरमालक बाहेर गावी गेल्याची संधी साधत सहा ते सात घरफोड्या झाल्या.त्यात

विद्यानगर ,संत सखाराम महाराज नगर , मुंदडा नगर ,सुंदर नगर , आल्हादनगर धुपी या ठिकाणी चोरट्यानी घराचा कडीकोंडा तोडून चोऱ्या केल्या.

 

यात महत्वाचे म्हणजे असे कीं चोरट्या ने खुद्द पोलिसांचे घर ही सोडले नाही..

अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशिक्षणासाठी रजेवर गेले आहेत. त्यांचा पदभार पारोळा येथील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आला होता. मात्र ते ही सुटीवर गेल्याने चोरट्यानी हात साफ करण्याची संधी साधली आहे.

 

मोटारसायकल चोरीचे प्रमाण ही वाढले..

शहरात भर दिवसा मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून रहदारीच्या वस्तीवरील आणि कॉलनी परिसरातील मोटरसायकलवर असतो प्रामुख्याने चोरट्यांचा डोळा दुपारी रेकी करणाऱ्यांना किंवा भटकणाऱ्यांना टोका ,त्यांचे नाव, गाव विचारा ,शक्य झाले तर त्यांचे फोटो काढून ठेवा आपली व आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला सजग रहावे लागेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!