मदनवाडी येथे 75 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा;विरवाडी विद्यालय व श्रीनाथ विद्यालय येथे विविध उपक्रम
(निलेश गायकवाड )
माध्यमिक विद्यालय वीरवाडी व श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मदनवाडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मदनवाडी ग्रामपंचायत च्या प्रथम नागरिक सरपंच सौ अश्विनी मारुती बंडगर यांच्या हस्ते विरवाडे येथील विद्यालयाचे ध्वजाची पूजा करून ध्वज फडकवण्यात आला तर श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल येथील जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते.
यावेळी विरवाडी महाविद्यालय माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मार्च 2023 या परीक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम दोन आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळेस करण्यात आला.
श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल येथे विविध उपक्रम व तसेच शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये व विविध उपक्रमांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण व बक्षीस वितरण करण्यात आले. श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंगाडे यांनी व त्यांच्या सर्व महाविद्यालयातील सर्व स्टाफ सुयोग्य नियोजन करण्यात आलेले होते.
तसेच मदनवाडी ग्रामपंचायतच्या वतीने मदनवाडीतील सहा जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालय यांना क्रीडा साहित्य प्रात्यक्षिक साहित्य व शाळांना खुर्च्यांचे वाटप करण्यात आले वेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंढरीनाथ कोकरे माजी प्राचार्य हे उपस्थित होते त्याचप्रमाणे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविंद्र कोकरे,वामन फुंदे, भागवत काळे, आप्पासाहेब बंडगर, संस्था अध्यक्ष नानासाहेब बंडगर , बी एस बंडगर पत्रकार निलेश, गायकवाड पत्रकार संजय शिंदे, अर्जुन बंडगर ,गौतम नीरु, सुनील कुंभार माजी सैनिक शहाजी बंडगर, बापू शिंदे, बाळासाहेब बंडगर , मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल येथे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, आदर्श सरपंच तुकारामजी बंडगर, ज्येष्ठ पत्रकार दादा थोरात , मदनवाडी ग्रामपंचायत सदस्य शरद चितारे तसेच सर्व पालक वर्ग व शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.
