बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी मधील माथाडी प्रश्नासाठी तहसील कचेरी समोर आमरण उपोषणचां आज तिसरा दिवस माथाडी बोर्ड व कंपनी यांनी कोणतेही ठोस कार्यवाही नाहीं…

अपनी भाषा में पढ़े! Translate

बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी मधील माथाडी प्रश्नासाठी तहसील कचेरी समोर आमरण उपोषणचां आज तिसरा दिवस माथाडी बोर्ड व कंपनी यांनी कोणतेही ठोस कार्यवाही नाहीं…

(निलेश गायकवाड )

 

अखिल भारतीय मराठा महासंघाने बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी लिमिटेड भादलवाडी व प्रशासन यांना माथाडी कामगार कंत्राटी कामगार आणि स्थानिक कामगार तसेच इतर मागण्यांसाठी सप्टेंबर 2023 रोजी लेखी निवेदन देऊन पंधरा दिवसांमध्ये संघटनेच्या मागण्याची पूर्तता करुन कामगारांना न्याय देण्याची मागणी केलेली होती त्यानंतरही संघटनेच्या मागण्याचा विचार न केल्यामुळे संघटनेने पुन्हा स्मरणपत्र दिलेले होते त्यानंतर मा. तहसीलदार साहेब इंदापूर यांनी त्यांच्या दालनामध्ये कंपनी प्रतिनिधी माथाडी कामगार बोर्ड प्रतिनिधी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब व संघटना प्रतिनिधी यांचे समक्ष बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला होता तो जर बैठकीमध्ये दिनांक 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ कार्यालयात मीटिंग घेण्याचे ठरलेले होते परंतु त्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली गेलेली नसल्यामुळे संघटनेने दिनांक 30/ 10 /2023 रोजी कंपनी तसेच प्रशासनाला लेखी निवेदन देऊन पाच नोव्हेंबर 2023 रोजी बिल्ट कंपनीच्या मुख्य गेटच्या समोर मराठा महासंघ तसेच सर्व सामाजिक राजकीय संघटनां सोबत हे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता त्यांनतर भिगवण पोलीस स्टेशन येथे बैठक घेऊन तात्काळ माथाडी प्रश्नासाठी प्राधान्य देउन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु त्यानंतर ही प्रश्न सुटलेला नसल्यामुळे संघटनेने पुन्हा निवेदन देऊन दिनांक 24 जानेवारी 2024 पर्यंत प्रश्न न सुटल्यास अमोल उपोषणाचा इशारा दिलेला होता त्यामुळे दिनांक 24 जानेवारीपासून तहसील कचेरी इंदापूर यांचे समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार दशरथ बंडगर, राजेंद्र रुपनवर राजेंद्र पडळकर ,संदीप पडळकर व सचिन राऊत हे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार उपोषणाला बसलेले आहेत सदर उपोषणावर ठोस उपाय करणेसाठी तहसिलदार श्री श्रीकांत पाटील यांनी प्रयत्न केला परंतू तोडगा निघाला नाही आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे

सदर आंदोलनाला यापूर्वीच भिगवण परिसरातील अनेक ग्रामपंचायती तसेच विविध सामाजिक संघटना यांचा जाहीर पाठींबा असले बाबत मराठा महासंघाला लेखी कळविलेले आहे
सदर आंदोलनाबाबत माथाडी कामगार प्रतिनिधी श्री दशरथ बंडगर यांनी सांगितले की आम्ही कंपनीमध्ये माथाडी काम चालू झाल्यापासून सदर ठिकाणी काम करीत होतो सन 2011 मध्ये माथाडी युनियनच्या वादामध्ये माथाडी बोर्डाने पूर्वी काम करणाऱ्या कामगारांना प्रतीक्षा यादी मध्ये टाकून कालांतराने त्यांना कामावर घेण्याचे लेखी दिलेले असताना सदर आदेशाची पायमल्ली करुन माथाडी कामगार भरती केली जात आहे त्यामुळे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेतृत्वाखाली आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणापासून मागे हटणार नाही असे सांगितले..

संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत..
१. मा.सहाय्यक कामगार आयुक्त सो पुणे यांनी दिनांक 11/ 11/ 2011 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे परिशिष्ट ब मधील प्रतीक्षा यादीतील कामगार यांना माथाडी बोर्डामध्ये नोंदित करून घेऊन त्यांना माथाडी म्हणून कामावर घेणेत यावे.
२. सदर दिनांक 11 /11/2011 चा आदेश मान्य नसल्यास तो रद्द करून मूळ 36 माथाडी कामगार ठेवण्यात यावे
३. माथाडी बोर्डाने दिनांक 11/11/ 2011 चा आदेश डावलून त्यानंतर आजपर्यंत केलेल्या नोंदीत कामगारांच्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा
४. सदर माथाडी बोर्डातील अनागोंदी कारभार करणारे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी.
५. बिल्ट कंपनीमध्ये सक्षम माथाडी निरीक्षक यांच्याकडून व संघटना प्रतिनिधी यांच्या समक्ष अचानकपणे कंपनीतील वेगवेगळ्या निवेदनात सांगितले ठिकाणची  तपासणी करून माथाडी स्वरूपाचे कामाची पाहणी करून तेथे माथाडी कामगारांची नोंदणी करून भरती करण्यात यावी
६. कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे कामगार यांना कायम कामगार म्हणून नियुक्ती करण्यात यावे
७. सदर कंत्राटी कामगार यांचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे कायद्याची पायमल्ली करीत आहेत त्यांना संघटनेने मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यास कंपनी प्रशासन यांनी सांगण्यात यावे
८. बिल्ट कंपनीकडून अनेक कायद्याची पायमल्ली होत असून मर्जीतील लोकांमार्फत कायम कामगार केले जातात त्याची चौकशी व्हावी
९. बिल्ट कंपनी शेजारील अनेक शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्यावर कायमस्वरूपी ची उपाययोजना करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी
१०. सदर बिल्ट कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी कामगार म्हणून प्राधान्याने भरती करण्यात यावी….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!