विविध मागण्यासाठी सरपंच परिषदेचे मंत्रालयावर आंदोलन ….
जळगाव – ग्रामविकासाच्या अडचणी लक्षात घेऊन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंचांना एसटी महामंडळाच्या बस मध्ये प्रवास मोफत करावा, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, सरपंचांना दरमहा सरसकट दहा हजार रुपये व उपसरपंच यांना तीन हजार रुपये तसेच सदस्यांनाही मानधन सुरू करावे तसेच अन्य मागण्यासाठी २२ मे रोजी कराड ते सातारा पदयात्रा आणि सातारा ते मुंबई भव्य मंत्रालयावर मोर्चा व प्रशासन यांनी लोकप्रियते नेहमी प्राधान्य दिले. त्यामुळे काढण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधी तसेच शासन साठी शहराच्या उदात्तीकरणाला ग्रामविकासाला खीळ बसली आहे राज्यातील सरपंच यांच्या अनेक समस्या तसेच ग्रामपंचायतचे प्रश्न त्याचप्रमाणे ग्रामविकासाच्या असंख्य अडी अडचणी असुन या बाबतीत धोरणात्मक बदल झाला नाही. अखेर सरपंचांनाच रस्त्यावर उतरावे लागेल . असा सज्जड दम सरपंच परीषदेच्या वतीने बैठकीत घेण्यात आला. सरपंच, सदस्य, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने या धडक मोर्चात आंदोलनासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन सौ. सुषमाताई वासुदेव देसले उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांनी केले.