डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे यांच्या सेवापुर्ती निमित्ताने कर्जत तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे यांच्या सेवापुर्ती निमित्ताने कर्जत तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन
कर्जत पंचायत समिती सभागृह
पशुसंवर्धन विभाग
तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर

प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:दि 25.आज कर्जत तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कर्जत तालुक्याचे सुपुत्र कर्जत तालुका पंचायत समिती पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर रामदास गांगर्डे यांच्या सेवापुर्ती निमित्ताने कर्जत तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . डॉ गांगर्डे साहेब यांची संपूर्ण नोकरी ची कारकीर्द कर्जत जामखेड तालुक्यातच राहीली ते पशुधन पर्यवेक्षक म्हणून कर्जत येथेच रूजू झाले व सेवापुर्ती देखील कर्जत पंचायत समिती येथेच झाली.हा विलक्षण अनुभव आणि योगायोग होता.सहसा असे भाग्य कोणाला लाभत नाही.
या सत्कार सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन जिल्हा अधिकारी डॉक्टर संजय कुमकर साहेब , पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री अमोल जाधव साहेब, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.राम अनभुले साहेब,कोंभळी गावचे सरपंच,मा. सरपंच शेखर खरमरे,राहुल गांगर्डे, तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी श्री पाटील साहेब ,कृषी विभागाचे श्री मुकुंद पाटील साहेब डॉ. साळुंखे सर डॉ. निंभोरे साहेब तसेच डॉ.दिनेश क्षिरसागर साहेब, डॉ.प्रकाश काकडे डॉ.देशमुख डॉ.पवार डॉ. संदीप बरबडे डॉ. विलास राऊत डॉ.अनारसे डॉ. खकाळ साहेब डॉ. गांगर्डे डॉ. निमसे, सेवानिवृत्त डॉ जाधव,श्री.नवले,श्री.सदाफुलेमामा,श्री.चव्हाण,श्री.तापकिर भाऊसाहेब तसेच पंचायत समिती विभागातील सर्व अधिकारी, डॉ गांगर्डे साहेब यांचे नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर ज्ञानेश्वर गांगर्डे साहेब यांचा 1985 ते नोकरीला लागल्यापासून सन 2023 पर्यंत जीवनपट उघडून सांगितला. यावेळी बोलताना अनेकांना अश्रू अनावर झाले.डॉक्टर ज्ञानेश्वर गांगर्डे साहेब यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. यावेळी अनेकांनी डॉक्टर गांगर्डे विषयी गमतीदार किस्से ही सांगितले. परंतु डॉक्टर गांगर्डे यांच्यातील खरा गुण म्हणजे त्यांचा संयम या त्यांच्या संयम या गुणालाच अधोरेखित करून अनेकांनी आपल्याला आलेले डॉक्टर गांगर्डे साहेब यांच्या विषयीचे अनुभव विशद केले. या सर्वांच्याच मनोगतामध्ये सगळ्यात वेगळे विचार, मनोगत, हृदयस्पर्शी विचार त्यांच्या मुलीने व्यक्त केले .त्यावेळी अनेकांच्या भावना दाटून आले होत्या.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन पंचायत समिती कर्जत चे पशुधन पर्यवेक्षक व डॉ ज्ञानेश्वर गांगर्डे साहेब यांचेच दुसरे बंधू डॉक्टर गांगर्डे साहेब यांनी केले.आभार तापकीर भाऊसाहेब यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!