June 30, 2025 3:20 am

सामान्य जनतेपुढे झुकले प्रशासन …

अपनी भाषा में पढ़े! Translate

सामान्य जनतेपुढे झुकले प्रशासन …

रजत डेकाटे// नागपूर प्रतिनिधी

उमरेड दि.२७ उदासा येथिल वार्ड क्रं १ मधील नळाची पाइपलाइन गेल्या दोन महिन्यांपासून बंद होती. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असता ग्रामपंचायत प्रशासनाने नागरीकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी मा.खंडविकास अधिकारी पंचायत समिती उमरेड यांच्या कार्यालयात दोन वेळा लेखी तक्रार केली. व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी केली. परंतु मा. खंडविकास अधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता ग्रामपंचायत प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्ती केली नाही. शेवटी ग्रामस्थांनी मा. खंडविकास अधिकारी पंचायत समिती उमरेड येथे धरणे आंदोलन केले. पंचायत समिती सभापती गितांजली नागभीडकर उपसभापती सुरेश लेंडे खंडविकास अधिकारी नितेश माने यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन २४ तासांत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्ती करून देऊ व संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करु असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास लावले. परंतु ४८ तास उलटून सुध्दा पाइपलाइन दुरुस्ती चे काम करण्यात आले नव्हते. म्हणून गावकऱ्यांनी परत धरणे आंदोलन करु असे पंचायत समिती व तहसील कार्यालय उमरेड यास कळविले. प्रशासनाने खडबडून जागे होऊन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्ती चे काम सुरू झाले. आजही पिण्याच्या पाण्याकरीता नागरिकांना संघर्ष करावा लागतो. ही मोठी शोकांतिका आहे. परंतु नागरीकांच्या संघर्षासमोर प्रशासनाला झुकावे लागले. व आंदोलनांला यश आले. आता प्रशासन ग्राम सचिवावर कोणती कारवाई करते या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!