June 29, 2025 8:56 pm

कर्जतचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रकांत निरावडे रुजू

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्जतचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रकांत निरावडे रुजू
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत :मागिल काही दिवसापासुन करजत पोलिस स्टेशनला पोलिस निरिक्षक हे पद रिक्त होते, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर कर्जतचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रकांत निरावडे रुजू झाले आहे. मंगळवार, दि ४ रोजी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी निरावडे यांचे स्वागत करीत कर्जतचा पदभार त्यांच्याकडे सोपवला.
अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक पदाच्या प्रशासकीय बदल्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पार पडल्या होत्या. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची कोतवाली पोलीस ठाणे अहमदनगर येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करे कर्जतचा पदभार घेणार होते. मात्र त्यांनी कर्जतचा पदभार काही कारणास्तव घेतला नाही. त्यामुळे मागील एक महिन्यापासून सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित कर्जतचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. मंगळवार, दि ४ रोजी कर्जतचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रकांत निरावडे हे कर्जत पोलिस स्टेशनला हजर झाले आहे. त्याचे स्वागत कर्जत पोलीस विभागाच्यावतीने प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, भगवान शिरसाठ आणि अमरजीत मोरे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!