आंबेडकरी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गटतट, मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज.
प्रतिनिधी -विकी ओहोळ
मो.नं 84 46 11 91 58
दौंड- दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबनराव कांबळे यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे दौंड शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात रविवार दि. 12 फेब्रुवारी रोजी दौंड शहरातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने व भीम अनुयायांच्या वतीने श्रद्धांजली व शोकसभेचा कार्यक्रम घेण्यात आला.
बहुजन समाजाचा आवाज म्हणजेच दैनिक वृत्तरत्न सम्राट अशी ओळख निर्माण झालेले व सम्राट च्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण काम बबन कांबळे यांनी दैनिक वृत्तरत्न सम्राट च्या माध्यामातून 2003 साली सुरू केले. बबन कांबळे सरांचे अकाली निधन म्हणजे आंबेडकरवादी मिशनचा आधारस्तंभ निखळला गेल्या दोन दशकापासून आंबेडकरवादी चळवळीचा धम्मक्रांतीला, शिक्षण क्रांतीला, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम माननीय कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली व सम्राट च्या माध्यामातून सुरू होते. कांबळे हे एक व्यक्ती नसून ती एक चळवळ होती ते समर्पित चळवळीचा एक आदर्श मानबिंदू म्हणून येणाऱ्या पिढीला नक्कीच मार्गदर्शन ठरतील त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला व अमिषाला बळी न पडता आपल्या लेखणीतून निर्भीड असे लेखन केले बबन कांबळे सरांचे निधन बहुजन चळवळीला खूप मोठा धक्काच आहे .
दौंड पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या शोकसभेत विविध पक्षाचे , विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व बबन कांबळे यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शोकसभेचे आयोजन शहरातील ज्येष्ठ नेते आबासाहेब वाघमारे व दौंड शहरातील सर्व पक्ष व सामाजिक संस्था यांनी केले होते.