2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष..
प्रतिनिधी:- प्रा.तुषार वाबळे
महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याचे योजिले आहे. याचे औचित्य साधून मौजे शेटफळगढे येथील श्री नागेश्वर विद्यालयातील 650 विद्यार्थ्यासमवेत गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्व असलेल्या म्हणीचा वापर करून विद्यार्थ्यांनी गावामध्ये घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री बी.आर भिसे ,पर्यवेक्षिका रोहिणी कुबेर व शिक्षक वृंद उपस्थित होता. तसेच गावच्या सरपंच सौ शितल धुमाळ,ग्रामपंचायत सदस्य राहुल वाबळे ग्रामस्थ रजनीकांत वाबळे ,पांडुरंग शेलार ,विनोद शिंदे ,सतीश कदम उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमांमध्ये तृणधान्य ज्वारी, बाजरी राळा,राजगिरा ,नाचणी वरी, या धान्याचे आहारातील, महत्त्व याविषयी मा. श्री भाऊसाहेब रुपनवर तालुका कृषी अधिकारी इंदापूर यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित गावातील शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करून पटवून दिले. त्यावेळी कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी श्री बाळासाहेब कोकणे , कृषी पर्यवेक्षक श्री संतोष सरडे, कृषी सहाय्यक श्री नारायण सोनवणे, सुनील झगडे प्रशांत मोहोळकर पल्लवी काळे उपस्थित होते .आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तालुक्यामध्ये पौष्टिक तृणधान्या विषयी जागृती करण्यासाठी तालुक्यामध्ये एक जानेवारी 2023 ते ३१ डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.पौष्टिक तृणधान्याचे महत्व जनतेपर्यंत जाण्यासाठी शेतकरी मेळावे, मोटरसायकल रॅली ,शाळा व कॉलेजमध्ये तृणधान्य विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन ,घडी पत्रिका द्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे .सदर कार्यक्रमांमध्ये आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करण्याबाबत आव्हान करण्यात आले आहे.
