महानुभाव पंथा चे संत शिरोमणी गुरुवर्य,अखिल विश्व महानुभाव परिषदचे अध्यक्ष
श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी शास्त्री यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.
रणाईचे येथील आश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुलाचार्य श्री वर्धनस्थ बिडकर हे वयाच्या 50 व्या वर्षी विराजमान झाले होते. सव्वाशे शिष्य गाद्या आणि नातू गाद्यांच्या दैदिप्यमान अशा पुर्व परंपरेचे ते 32 वे आचार्य होते.
बाबाजींनी रणाईचे येथे आश्रम उभारून त्यास प्रणवाश्रम नाव ठेवले. बीड, अमरावती जवळ चांदुर बाजार, पैठण जवळ पाचोड,तर नाशिक येथे मोरवाडी, या ठिकाणीही पंथीयशाखा स्थापन केल्या.
ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी देखील रणाईचे येथे जाऊन बाबांचे अखेरचे दर्शन घेतले.
बाबाजींच्या पश्चात आश्रमस्थ तसेच आयुयायी परिवार पोरका झाला आहे, श्री गुरुवर्यांच्या देहावसानानंतर परम पूज्य. निलेश दादा, बबलु दादा, अप्पू दादा, विनय मुनी,विशाल दादा,हर्षल शास्त्री, प्रभाताई बिडकर यासह सर्वच अश्रमस्थ तसेच सव्वाशे शिष्यगाद्या, नातु गाद्या शोकसागरात लीन झाल्या आहेत.