June 30, 2025 6:20 am

भादलवाडी जवळ बिल्ट कंपनी मटेरियल गेट समोर अपघातात एकाचा मृत्यू:भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

भादलवाडी जवळ बिल्ट कंपनी मटेरियल गेट समोर अपघातात एकाचा मृत्यू:भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(निलेश गायकवाड )

भिगवण :सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट ने कंटेनर ला धडकल्याने झालेल्या अपघातात स्विफ्ट कारमधील एक जण जागीच ठार तर इतर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 07.30 वा मौजे भादलवाडी गावाच्या हद्दीत बिल्ट कंपनीच्या मटेरील गेट समोर घटना घडली. भिगवण पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन मध्ये प्रफुल्ल रमेश क्षिरसागर वय 39, राहणार ए / 468 अदित्यनगर विजापुर रोड सोलापुर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालका विरुध्द भा.द.वि.कलम 279,304 ( अ ),337,338,427 मोटार वाहतूक कलम -184,134 / 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून सोलापूर बाजूकडे निघालेला कंन्टेनर वाहन नंबर MH – 04 JK – 4405 हा बिल्ट कंपनीचे मटेरिअयल गेटचे समोर आल्यानंतर तो रस्ता दुभाजक ओलांडून सोलापूर पुणे लेन कडे ओळला.यावेळी सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेली भरधाव कार वाहन नंबर MH 13BQ 0097 या कंन्टेनर या येऊन धडकली.या अपघातात फिर्यादीचे डावे हाताचे मनगटाजवळ व छातीस गंभीर व किरकोळ दुखापत झाली. राजकुमार श्रीपती वाघमारे वय 62 वर्षे यांचे डोक्यास व इतर ठिकाणी किरकोळ व गंभीर दुखापत झाली. तर उमेश श्रीकृष्ण वैदय वय 47 वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वारगड हे करित आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!