तांदुळवाडी जि. प. शाळेत बालदिंडी उत्साहात..

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-23 at 12.45.32 PM

तांदुळवाडी जि. प. शाळेत बालदिंडी उत्साहात..
माढा, प्रतिनिधी
(अजिनाथ कनिचे )
अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची वेध लागले असताना, आषाढी वारी निमित्त सोलापूर जिल्ह्यात सर्व संतांच्या पालख्यांचे आगमन होताच प्रत्येक गावागावात विठोबाच्या नामाचा गजर सगळीकडे दुमदुमत असताना जि. प. शाळा तांदुळवाडी येथे बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बाल दिंडीत विठोबाराया, रुक्मिणी माता, तसेच अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान करून, हातात भगवी पताका घेऊन ज्ञानोबा तुकाराम, विठूनामाच्या गजरात गावातून बालदिंडी साकारली. या विठूनामाच्या गजरात गावकऱ्यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभाग नोंदवला.
भक्तिमय वातावरणामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांचे गावातील महिलांनी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात फुगड्या आणि पारंपारिक रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. या बालदिंडी सोहळ्यामध्ये गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ यांनीही आनंदी उत्साहात सहभाग नोंदवीला होता.
यावेळी अजिनाथ (बापू) परबत, राजाभाऊ शिंदे, शाहू कदम,पत्रकार अतुल गवळी, नेताजी गवळी, बाबुराव गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच हा बालदिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर, गटकळ मॅडम,राक्षे मॅडम, कुंभार सर, जाधव सर, कांदे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट व सर्व सदस्य यांनी अधिक परिश्रम घेत बाल दिंडी यशस्वी केली.

in
in

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!