बोराडी : यंदाचा नामांकित पद्मश्री कवीश्रेष्ठ नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणेचे अध्यक्ष कवी संतोष गाढवे, यांच्यावतीने किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यापक विद्यालयाचे उपशिक्षक अरविंदा भामरे यांच्या
शापित कोलाहलाच्या नोंदी या कवितासंग्रहाला नुकताच जाहीर करण्यात आला.त्यासोबत महाराष्ट्रातील केशव सखाराम देशमुख पुणे -लाकडाचे कान,संतोष दोडे – निर्जनांचे प्रदेश /वंशावळीच्या प्राचीन सरीतून -प्रतिभा खैरनार नांदगाव //ऋतू समिधांच्या आर्दा- संतोष घसींग बीड या इतर साहित्यकृतींनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे . पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा हा पुरस्कार फार मोठ्या उंचीचा नामांकित पुरस्कार मानला जातो .दरवर्षी सकस व दर्जेदार सामाजिक जाणीव असलेल्या कविता संग्रहाला हा पुरस्कार दिला जातो . पुरस्कार्थी कवींना रोख रक्कम ,सन्मान चिन्ह , श्रीफळ देऊन पुणे येथील भव्य दिव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे .
कवी अरविंदा भामरे यांच्या या संग्रहाला यंदाचा मानव प्रचारक काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . आसवांच्या विद्रोह नंतर त्यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे .त्यांच्या या यशाबद्दल किसान उद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ . तुषार रंधे , सचिव निशांत रंधे ,खजिनदार आशाताई रंधे ,बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे, शिरपूरचे नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित रंधे ,ग स बँक चे संचालक शशांक रंधे, अध्यापक विद्यालयाचा स्टाफ व प्राचार्य डॉ . सुचित्रा वैद्य, डॉ .फुला बागुल यांनी अभिनंदन व कौतुक केले .