लवकरच राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार NCC चे प्रशिक्षण – शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

अपनी भाषा में पढ़े! Translate

लवकरच राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार NCC चे प्रशिक्षण – शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लवकरच राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेतू) च्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्तिपर गीतांवर विशेष कवायती घेण्यात येणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

🔴एनसीसी प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा

दादा भुसे यांनी सांगितले की, सध्या राज्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थी एनसीसीचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राज्यात एनसीसीची नवीन प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

🟢माजी सैनिकांची मदत घेणार

विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी प्रशिक्षण मिळावे यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी होईल, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

🟣देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यावर भर

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील. एनसीसीप्रमाणे शिस्त, सेवा आणि नेतृत्वगुणांची जोपासना करण्यात येणार आहे.

राज्यातील शालेय शिक्षणाच्या पातळीवर ही योजना राबविण्याची तयारी सुरू असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडेल, असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!