भिगवण रोटरी क्लब चा शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम;सात शाळांमध्ये आयडीयल स्टडी ऍप चे वितरण संपन्न
(निलेश गायकवाड)

भिगवन रोटरी क्लब नेहमी सामाजिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवत असते. असाच उपक्रम रोटरी क्लब च्या वतीने आज भिगवण येथील सात शाळांमध्ये शैक्षणिक दृष्टीने महत्वपूर्ण आयडियल स्टडी ॲप वितरण करण्यात आला.
यामध्ये आयडियल स्टडी ॲप चे प्रमुख वैशिष्ट्ये आयडियल स्टडी मोबाईल ॲप
हे ॲप दहावीचा विद्यार्थ्यांकरता करण्यात आलेले आहे हे ॲप तीन भाषांमध्ये तयार केलेले आहे इंग्रजी मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हे ॲप आहे ह्या ॲप मध्ये प्रत्येक चाप्टर खालील नोट्स व प्रश्नपत्रिका व त्याचे उत्तर पत्रिका त्याचप्रमाणे चार चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका व त्याच्या उत्तर पत्रिका सहामाही ची प्रश्नपत्रिका व त्याचे उत्तर पत्रिका वार्षिक ची प्रश्नपत्रिका त्याची वृत्तपत्रिका त्याचबरोबर गेल्या पंधरा वर्षांमध्ये ज्या ज्या प्रश्नपत्रिका दहावीच्या येऊन गेल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका व त्याच्या उत्तर पत्रिका दिलेल्या आहेत यामध्ये काही व्हिडिओ काही ऑडिओ क्लिप दिलेले आहेत ॲपचे उद्देश
ज्या विद्यार्थ्यांना ट्युशन लावणे आर्थिक दृष्ट्या शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे ॲप करण्यात आलेले आहे, हे ॲप विद्यार्थ्यांच्या आई किंवा वडील यांच्या मोबाईल वरती लोड करायचे आहे हे ॲप शाळेत वापरायचे नाही जेव्हा विद्यार्थी आपल्या घरी असतो तेव्हा त्याने आई-वडिलांच्या मोबाईल वरती लोड असलेले वापरायचे आहे अशी संकल्पना आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल असणे आवश्यक नाही. अश्याप्रकारे
या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, भिगवन रोटरी क्लब चे विद्यमान अध्यक्ष निखिल बोगावत, सचिव कुलदीप ननवरे, सदस्य संपत बंडगर संतोष सवाने किरण राईसोनी संजय खाडे प्रदीप वाक्षे बापूराव थोरात महेश शेंडगे विठ्ठल थोरात डॉक्टर अमोल खानवरे, रंजीत भोंगळे प्रवीण वाघ नानासाहेब बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.