January 30, 2025 7:59 pm

अजून सुद्धा एकनिष्ठथा आणि तेवढंच प्रेम आहे असे म्हणावे लागेल;हर्षवर्धन पाटील सुद्धा झाले भावुक

अपनी भाषा में पढ़े! Translate

अजून सुद्धा एकनिष्ठथा आणि तेवढंच प्रेम आहे असे म्हणावे लागेल;हर्षवर्धन पाटील सुद्धा झाले भावुक

(निलेश गायकवाड)

सामाजिक जीवनात वाटचाल करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये ठेवून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तळागाळातील व गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र समाजसेवा चालू ठेवली. इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते तसेच नागरिक आपले कामाची ओझे घेऊन भाऊंच्या दरबारामध्ये नित्यनियमान येत असतात. पाटील यांच्या दरबारामध्ये कोणीही मोकळ्या हाताने जात नाही. आलेल्या प्रत्येक माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी झोकून दिले आहे.

हनुमान वाडी येथील ज्येष्ठ सहकारी असणारे हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय श्री मारुती जगताप यांनी आपल्याकडील काही कामे घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्या घरी त्यांची भेट घेत . कामाचे निरसन केले . व जाताना हर्षवर्धन पाटील यांना आपल्या खिशात असणारा सदैव फोटो दाखवत साहेबांवर असणारे प्रेम प्रकाशित केले. या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या खिशातून काढलेला फोटो दाखवत भाऊंचे मन जिंकले. साहेबांना ही काही वेळ भावुक होतं,त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यातून एक चित्र असे स्पष्ट झाले सामाजिक राजकीय जीवनात आपण जर काही संपत्ती कमवली असेल तर ती आहे माणसांचे प्रेम . आणि हेच चित्र आज इंदापूर तालुक्यातील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी घडले….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!