June 30, 2025 12:00 am

विद्यार्थी ग्रामस्थ यांनी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करावा… रोटरी क्लब _

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्यार्थी ग्रामस्थ यांनी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करावा… रोटरी क्लब _

इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे
गुरुवार दिनांक 27/6/2024 रोजी ग्रामपंचायत कुंभारगाव व रोटरी क्लब ऑफ भिगवन यांच्या संयुक्त विद्यमानाने कुंभारगाव हद्दीतील वनविभाग क्षेत्रात 500 झाडे लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला… आपल्याला जर निरोगी जीवन जगायचं असेल तर आपण निसर्गाशी मैत्री करावी तसेच विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त प्लास्टिक ,थर्माकोल व इतर पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या व प्रदूषणात वाढ होणाऱ्या वस्तू वापरण्याचे टाळले पाहिजे…..
सदर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी गावच्या सरपंच ॲड.सौ स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांनी प्रास्ताविक केले ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पुणे जिल्हा मोरफा चे अध्यक्ष श्री कुंडलिक धुमाळ यांनी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. तसेच रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री संतोष सवाने तसेच ,मा.अध्यक्ष श्री संजय खाडे आणि संस्थापक अध्यक्ष श्री सचिन बोगावत यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी व कुंभारगाव शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला गेला.
सदरच्या कार्यक्रमासाठी मा अध्यक्ष श्री संपत तात्या बंडगर, श्री संजय शेट राईसोनी, श्री किरण शेठ रायसोनी ,श्री कुलदीप ननवरे ,तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ स्नेहलताई धुमाळ ,उपसरपंच सौ स्वातीताई भोईटे, माजी सरपंच सौ जयश्री धुमाळ, कुंडलिक धुमाळ ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन गोरे, श्री उदय शेठ भोईटे, वनविभाग अधिकारी सौ कांबळे मॅडम ,श्री दत्तात्रय धुमाळ ,श्री संजय धुमाळ, श्री कल्याण धुमाळ आणि ग्रामस्थ व मुख्याध्यापक श्री ताराचंद ढोले उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील वाघ गुरुजी यांनी केले आभार उपसरपंच सौ स्वातीताई भोईटे यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!