रशियातील नदीत बुडून मृत पावलेल्या जिया आणि जिशान दोघावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
अमळनेर : विक्की जाधव..
रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ४ भारतीय विद्यार्थ्यांचा ४ जून रोजी वोल्खोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला होता. या मृत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जिया पिंजारी व जिशान पिंजारी दोघे विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान १० दिवसानंतर या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात आल्यावर काल सकाळी अमळनेर येथे दाखल झाले. यावेळी जिया व जिशान या भाऊ बहिणीवर मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उसळला होता तसेच समाजमन देखील सुन्न झालं होतं.
मंत्री अनिल पाटील यांनी देखील सहभाग घेऊन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.