श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित स्व.बापुसो. मोहनलाल अग्रवाल प्री प्रायमरी स्व. तात्यासो. प्रल्हादराव पाटील सरस्वती प्राथमिक व सरस्वती माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन शिरपूर पोलीस स्टेशनचे दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सौ छाया पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिलीप लोहार होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त श्री प्रभाकरभाऊ शिंपी श्रीमती शोभाताई मोरे श्री राधेश्याम गुप्ता श्री महेशभाऊ लोहार श्री अनिल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी श्री.धिरज भिमराव माळी व अमोल सुदाम माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करतांना सौ.पाटील मॅडमांनी मुलांनी मोबाईलचा वापर टाळावा. सर्वसामान्य परिस्थिती असताना सुद्धा यशाचे शिखर गाठता येते कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.मुलीनी धाडसी बनावे.असा संदेश दिला. विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्हि. जे बागुल सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले…