June 30, 2025 9:08 am

विभाग शिक्षणाधिकारी म्हणतात आम्ही माफी मागतो प्रताप हायस्कूल येथे मांसाहारी पार्टी झाली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

विभाग शिक्षणाधिकारी म्हणतात आम्ही माफी मागतो प्रताप हायस्कूल येथे मांसाहारी पार्टी झाली.

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप हायस्कूल मध्ये 4 फेब्रुवारी रोजी मांसाहारी पार्टी झाल्याचा आरोप अंमळनेर येथील जैन समाजाने केला असून, शाळेच्या मुख्याध्यापक प्रमोदिनी पाटील यांनी मात्र आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. तर किरण कुवर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी प्रताप हायस्कूल येथे मांसाहारी भोजन केल्याची कबुली देत माफी मागितली आहे.
या शाळेची वास्तू ही जैन समाजाची आहे याबाबत जैन समाजाने शिक्षण मंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या प्रकरणामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.
या बाबत मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा पोलीस तक्रार केली जाईल. शैक्षणिक संस्थेचे पवित्र राखले जात नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
संपूर्ण जैन समाज या कृतीच्या निषेध करीत असून अशा आशयाचे निवेदन जैन समुदायाचे एचडी ओसवाल खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप जैन प्रकाश छाजेड मांगीलाल जीन पूनम कोचर शीतल जैन आदींनी संस्थेचे कार्याध्यक्ष व सचिव यांना दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!