June 29, 2025 5:37 pm

दिव्यांग विद्यार्थ्यांना साहीत्य देण्याच्या उद्देशानेआयोजित केलेल्या मोजमाप शिबीरात ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी;गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिव्यांग विद्यार्थ्यांना साहीत्य देण्याच्या उद्देशानेआयोजित केलेल्या मोजमाप शिबीरात ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी;गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात

(निलेश गायकवाड )

भिगवण (प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना साहीत्य देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या मोजमाप शिबीरात ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती इंदापूरचे गटशिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभाग समावेशित शिक्षण तसेच ॲटोमोबॉईल्स कंपनी शिरूर यांच्या सयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी फियाट इंडिया ॲटोमोबॉईल्स कंपनीचे व्यवस्थापक अमोल फटाले इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात पुणे जिल्हा परिषद पुणे चे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव देवकाते नारायणदास रामदास कॉलेजचे मुख्याध्यापक सोरटे सर विशेष शिक्षक माधुरी सावंत बशीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळीदिव्यांग विद्यार्थ्यांसह पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.यावेळी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबिरात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार एकूण 70 विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र कॅपो व्हीलचेअर ट्रायसिकल साहित साधने संदर्भित करण्यात आले. आलेल्या विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे व खाऊ वाटप करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सुदर्शन गोरे अनिल जोगदंड, गौरिश सर, लव कुमार सर, निरज कुमार सर, रिषभ सर, व समावेशित शिक्षण विभाग माधुरी सावंत ज्ञानेश्वर साळुंखे सर बशीर सय्यद सर सुधाकर पाटील सर शंकर सावंत सर किशोर कानगुडे सर मनिषा गडदे यांनी विशेष प्रयत्न केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांनी केले तर आभार विशेष शिक्षीका माधुरी सावंत यांनी मानले .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!