वडाळा पैकु येथे दत्त जयंती साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

वडाळा पैकु येथे दत्त जयंती साजरी

रजत डेकाटे – प्रतिनिधी

चिमुर:- वडाळा पैकु महानुभाव पंथाच्या वतीने येथे दत्त जयंती साजरी करण्यात आली.
क्रिशिका मेश्राम या बालिकाने स्वागतगीत सादर करून पाहुणे मंडळीचे स्वागत केले.

यावेळी वडाळा पैकु येथील दत्त मंदिरातून दत्त प्रभुची पालखी संपूर्ण वडाळा पैकु परीसरात फिरविण्यात आली.
यावेळी रात्री भजन संध्याचा कार्यक्रमात विविध मंडळांनी सहभाग घेतला होता.
दि.२७ डिसेंबर रोजी वडाळा पैकु येथील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महंत ऐकोव्यास बाबा वसंतशास्त्री चंद्रपूर होते .प.पु.हंसराज दादा खांदारकर मनसर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. महंत उध्दवराज पंजाबी, संचालक श्रीकृष्ण मंदीर लोणारा,
महंत नरेंद्रमुनी पंजाबी सिंदेवाही,
महंत राजेंद्रदादा सेवारकर वडाळा पैकु यावेळी संत महात्मे उपस्थित होते.

चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची विशेष उपस्थिती होती.
माजी जिल्हा परिषद सदस्य – विलास डांगे यांची उपस्थिती होती.

यावेळी बबन बन्सोड, कैलास चौधरी, माणिक टेंभुरकर, प्रदिप वासनिक, मधुकर जांभुळकर, प्रमोद गौरकार,राजु जांभुळकर, श्रावण गौरकार, नरेंद्र बन्सोड, धनराज गौरकार,हेमचंद गौरकार, दत्तराज पाटील, जगदीश गौरकार,प्रेमदास वासनिक, हेमराज इंदुरकर, यावेळी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
कुणाल बन्सोड, आर्यन बन्सोड ,जयंत गौरकार  व इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!