आंबेगव्हाणचे रहस्य कवी प्रा.सौरभ नवले यांच्या का गुंतला माझा जीव तुझ्यात …? कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आंबेगव्हाणचे रहस्य कवी प्रा.सौरभ नवले यांच्या का गुंतला माझा जीव तुझ्यात …? कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न.

ओतूर – कला संस्कृती ज्ञान संगम मंच महाराष्ट्र राज्य आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने, आंबेगव्हाण येथील प्रा.सौरभ नवले (रहस्य कवी) यांच्या का गुंतला माझा जीव तुझ्यात…? या ग्रामीण बाज असलेल्या कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलन नुकतेच आंबे गव्हाण येथे संपन्न झाले.
हा कार्यक्रम तीन सत्रात संपन्न झाला.यामध्ये उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून पहिल्या सत्राला सुरुवात करण्यात आली.उदघाटक म्हणून रायगड महाडच्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तेराव्या वंशजा डॉ.शीतल मालुसरे उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी सोलापूरचे काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आणि रत्न प्रिया प्रकाशनाचे प्रकाशक आनंद घोडके होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पाठ्यपुस्तकातील कवी उत्तम सदाकाळ, पनवेलच्या रिल्स स्टार अभिनेत्री रसिका वाणी, पटकथा लेखक ,दिग्दर्शक आकाश रायकर , धाले वाडी तर्फे हवेली गावचे उपसरपंच व जुन्नर तालुका परिट समाजाचे अध्यक्ष सुभाष दळवी, आंबे गव्हाण गावच्या सरपंच अनिता डोके हे मान्यवर उपस्थित होते.उपस्थित ग्रामस्थांमधुन शुभम लंबे, माजी सैनिक आंबेगव्हाण गावचे सुपुत्र जालिंदर महाले आंबेगव्हाण गावचे उपसरपंच राजेन्द्र गायकर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रचलित पद्धतीला फाटा देत सौरभ नवले यांनी आपल्या का गुंतला माझा जीव तुझ्यात ..? या कादंबरीचे प्रकाशन अनेक मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आई-वडील सौ.लता व चंद्रकांत नवले आणि आजी- आजोबा सौ .रतनाबाई व बबनराव गायकवाड यांच्या हस्ते केले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा व सौरभ नवले यांच्या सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या सत्रामध्ये गझलमूशायरा संपन्न झाला.यावेळी या अध्यक्षस्थानी सोलापूरचे ज्येष्ठ गझलकार कालिदास चवडेकर तर पुण्यातून डॉ.शुभा लोंढे ,सतीश मालवे, सोलापूरवरून नवनाथ खरात ,रायगड येथून ज्योती शिंदे, मंचरवरून नवनाथ गाडेकर ,जुन्नरवरून प्रा.जयसिंग गाडेकर व सरिता कलढोणे सहभागी होते.
तिसरे सत्र कविसमेलनांनी रंगले.यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्रभर हास्यकवी म्हणून ओळख असलेले बाप स्वाभिमानी बाणा या कवितेचे जनक पुण्याचे अनिल दीक्षित होते.तर सोलापूरहून आलेले महेश रायखेलकर, श्रीमंत कोळी शुभांगी शिंदे , शकील जाफरी, सरिता कलढोणे, डॉ.रोहिणी मदने ,महेश पंधरे, मनोज डुंबरे, केशव ठाकरे, बाळासाहेब शेख सर, संदीप वाघोले,रणजित पवार, सौरभ नवले, इंदुबाई हांडे यांनी बहारदार रचना सादर केल्या.
तीनही सत्राचे सूत्रसंचालन अनुक्रमे गणेश मोढवे आंतरराष्ट्रीय निवेदक, सुप्रसिद्ध निवेदिका कविता काळे व भागवताचार्या अर्चना नेवकर यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल नवले,सौरभ नवले व त्यांचे कुटुंब, संदीप वाघोले ,रणजित पवार, विशाल शिंदे व समस्थ ग्रामस्थ आंबेगव्हाण- पाचघर, यांनी अधिक परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!