करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे 50 खाटा वरून शंभर खाटामध्ये विस्तारीकरण करण्याचे काम सुमारे 23 कोटी रुपयाला ओमकार कंट्रक्शन पुणे या कंपनीला दिले आहे मात्र या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून वारंवार तक्रारी करून सुद्धा बांधकाम खात्याचे अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारातून ठेकेदाराला संरक्षण देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे यांनी केला आहे
या कामाच्या पायामध्ये मुरूम व मजबुतीसाठी गोल दगड गोटे वापरण्याचे निर्देश असताना यात काळी माती भरण्यात आलेली आहे
या संपूर्ण बांधकामात वाळू ऐवजी कचकडी वापरल्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. स्टील डिझाईन मध्ये सुद्धा बरीच तफावत असून संबंधित ठेकेदार तक्रार करायला गेल्यानंतर तेथील गुंडा मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे.
विशेष म्हणजे हे वीस कोटी रुपयांचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची किंमत बारा टक्क्यांनी वाढवून 23 कोटी पर्यंत नेली आहे. या याशिवाय या कामावरचा जीएसटी सुद्धा कंपनीला देण्यात येणार आहे. या कामावर बेकायदेशीर बाहेर राज्यातील अल्पवयीन मजुरांचा वापर केला जात आहे. स्थानिक मजुरांना या ठिकाणी काम दिले जात नाही
केंद्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची योजना म्हणून या इमारतीसाठी 23 कोटी रुपयांचा निधी दिले असताना या कामाची तपासणी करण्यासाठी चालू बांधकाम खात्याचे अधिकारी कधीही तेथे हजर नसतात
या कामा संदर्भात माहितीच्या अधिकारात अर्ज दिला तर उडवाउडी ची उत्तरे दिली जातात
या कामासाठी खडी कचकडी इतर मालपुरवठा करण्यासाठी काही गावगुंडांची नेमणूक करण्यात आली असून या गुंडामार्फत या कामाची पाहणी करण्यास गेलेल्या लोकांना अडकाटी केली जाते
कामाची गुणवत्ता तपासणी साठी स्वतंत्र कमिटी नेमावी अशी मागणी राखुंडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री सुकलाल मांडवी,आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेले आहेत.
निकृष्ट दर्जाची इमारत बांधून शासनाची फसवणूक होत असताना याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यासाठी गुंड नेमले जातात ही विघातक प्रवृत्ती करमाळा रुजू पाहत आहे याला वेळी चा आळा घातला पाहिजे अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे