डायल केलेला नंबर चुकीचा आहे. एन एच.ए.आय. टोल फ्री क्रमांक ०१२०६२००९०० हा क्रमांक कायम बंद.

अपनी भाषा में पढ़े! Translate

डायल केलेला नंबर चुकीचा आहे. एन एच.ए.आय. टोल फ्री क्रमांक ०१२०६२००९०० हा क्रमांक कायम बंद.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चुकीच्या टोल नाक्या मुळे परिसरातील नागरिक हैराण. – दौंड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आरोप .

प्रतिनीधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ वर अनेक ठिकाणी बस थांबे कमतरता , अस्वच्छ शौचालये, वाहन चालक विश्रांती थांबे , अपूर्ण व खराब सर्विसरोड, स्ट्रीट लाईट महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध नाही. तसेच टोल उभारणी अत्यंत चुकीच्या ठिकाणी करण्यात आली असून त्यामुळे पाटस परिसरातील अनेक गावाचे नागरिक बारामती या ठिकाणी सेशन कोर्ट, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, एमआयडीसी, साखर कारखाने, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, आर्.टी.ओ, महावितरण परिमंडळ कार्यालयकडे जाताना काही फुट अंतर साठी ९० रुपये व परत येताना ४५ रुपये असा एकूण १३५ रुपये टोल घेतला जात असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. नियोजन नसल्याने चुकीच्या ठिकाणी टोल नाक्यास परवानगी देण्यात कशी आली? त्याची समंती स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन करण्यात आली होती का ? एन एच.ए.आय. टोल फ्री क्रमांक ०१२०६२००९०० हा क्रमांक कायम बंद असून तक्रारपुस्तिका हि टोल नाक्यावर न ठेवता पार्किंग मध्ये सुरक्षा रक्षकाकडे ठेवून ग्राहकांना दिली जात नाही , धनदांडगे यांची वाहने मोफत सोडली जातात व सर्वसामान्य स्थानिक नागरिकांची टोलसाठी अडवणूक केली जाते. त्यामळे २० कि.मी. परिघातील नागरिकांना सरसकट टोल माफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असे न झाल्यास टोल प्रशासन नागरिकांचे मुलभूत अधिकार डावलत असल्याने आपणा विरोधात फार मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ,आपले प्रस्ताव, मंजूर रस्ते करार, नकाशे, अपुर्ण कामे यांची माहिती सविस्तर कागदपत्रे पुरावा देण्यात यावा, नागरिकांना माहितीसाठी नागरिकांची सनद दर्शनी भागात उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी दौंड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी टोल प्रशासन अधिकाऱ्यांशी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली असून यावेळी दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, शहराध्यक्ष गणेश जगताप, ऋषिकेश बंदिष्टी, अपर्णा पंडित,भाऊसाहेब दुरकेर, अर्जुन थोरात, संगीता गायकवाड, किसन भागवत, कैलास पंडित, कैलास थोरात, बाळासाहेब थोरात, अभिजीत भागवत, पोपट चोरमले, अमोल भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!