18 व 19 फेब्रुवारीला नागपूर जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

अपनी भाषा में पढ़े! Translate

18 व 19 फेब्रुवारीला नागपूर जिल्हा
महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

नागपूर जिल्हयातील व विभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा होणार आहे. आज या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील दोन आठवडयात शासकीय सुटयांच्या काळात ही स्पर्धा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
नागपूर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 18 व 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर विभाग स्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे आज अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी जाहीर केले. यामध्ये क्रिकेट, कबड्डी,खो-खो ,व्हॉलीबॉल फुटबॉल, बुद्धिबळ,कॅरम, कॅरम दुहेरी,टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जलतरण, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, खो -खो, थ्रो बॉल, पुरुष व महिला गटातील स्पर्धा होणार आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील बैठक झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे, पियुष चिवंडे, पूजा चौधरी, शिवनंदा लंगडापुरे, हेमा बडे, शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!