डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-10-18 at 12.31.39 PM

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – नवयुग शिक्षण संस्थेचे स्व. लाजवंती भावनदास गॅरेला माध्य.व उच्च माध्य. विद्यालय भिमनगर, दौंड व नवयुग प्राथमिक शाळा दौंड. या विद्यालयामध्ये दि.15ऑक्टोबर रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन निमित्ताने वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा. बाळासाहेब वागसकर सर व मुख्याध्यापक मा.संदीप मांडे सर यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालय प्रमुख सुनील शेळके सर यांनी ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी देण्यात दिली. विज्ञानमंच प्रमुख नितीन लोदाडे सर यांनी कलाम यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपल्या विकासामध्ये पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व असून आपण दररोज ज्ञानवर्धक पुस्तकांचे वाचन करायला हवे असे मा.संदीप मांडे सर यांनी सांगितले तर, प्राचार्य मा. बाळासाहेब वागसकर सर यांनी आपल्या मार्गदर्शनामधून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला “वाचाल तर वाचाल” हा मोलाचा संदेश दिला. विद्यालयाचे पर्यवेक्षक हनुमंत धालपे यांनी आपल्या बौद्धिक विकासामध्ये वाचनाला खूप महत्त्व आहे हा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पवार सर व संजय खामकर सर यांनी विशेष परिश्रम केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!