वाचनातून विचारांना पंख; योगेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261016-WA0692

वाचनातून विचारांना पंख; योगेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात

 

अमळनेर : विक्की जाधव.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर २०२६ रोजी योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु. येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. एम. जाधव होते. प्रारंभी मुख्याध्यापकांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी कलाम यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त करून त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक म्हणून विद्यालयातील मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले. तसेच अध्यक्ष वाय. एम. जाधव यांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचनही करून घेण्यात आले.

यावेळी विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती वैशाली पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, त्यांचा संघर्ष, वैज्ञानिक म्हणून केलेले कार्य तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दिलेला संदेश यांचा प्रभावीपणे परिचय करून दिला. श्रीमती शिरसाठ मॅडम, श्री एच बी शिरोळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वाय. एम. जाधव यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जोपासण्याचे आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही ए पाटील यांनी करताना डॉ. कलाम यांच्या जीवनातील छोट्या-छोट्या प्रेरणादायी प्रसंगांचा उलगडा करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी, या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!