प्रगतशील महाराष्ट्र नवउद्योजकांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली उद्योगविश्वाची प्रेरणा

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261012-WA1492

प्रगतशील महाराष्ट्र नवउद्योजकांच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली उद्योगविश्वाची प्रेरणा

 

अमळनेर : विक्की जाधव.

योगेश्वर माध्यमिक विद्यालय, उदयनगर (डांगर बु.), ता. अमळनेर येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक ९ ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे आयोजित ‘प्रगतशील महाराष्ट्र’ नवउद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन विविध क्षेत्रांतील नवनवीन संकल्पना व उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तसेच माननीय खासदार ताईसो स्मिता उदय वाघ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना कृषी, शिक्षण, क्रीडा, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील नवउद्योजकांच्या कार्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी विविध उद्योजकांच्या दालनांना भेटी देत त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना, संशोधन, उत्पादने आणि कार्यपद्धती यांविषयी जाणून घेतले. प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी उद्योजकांशी संवाद साधत उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसेही मिळवली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्योजकतेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली.

विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी उपक्रम पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असते. या प्रदर्शनभेटीमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधी, नवकल्पना आणि स्वयंरोजगाराचे महत्त्व समजण्यास मदत झाली. त्यामुळे ही भेट विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाय. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा शैक्षणिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे शाळा परिसरातून कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!