बारामतीत अटकावून ठेवलेल्या पाच वाहनांचा २३ ऑक्टोबरला ई-लिलाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-10-14 at 8.47.16 PM

बारामतीत अटकावून ठेवलेल्या पाच वाहनांचा २३ ऑक्टोबरला ई-लिलाव

थकीत कर, दंड व अन्य देय रक्कम भरून वाहनांचा ताबा घेण्याचे परिवहन कार्यालयाचे आवाहन

बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

मोटार वाहन कर थकविणे तसेच मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकावून ठेवण्यात आलेल्या पाच वाहनांचा येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भंगार स्वरूपात ई-लिलाव करण्यात येणार आहे. संबंधित वाहनमालकांनी सात दिवसांच्या आत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून वाहनांचा ताबा घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्याकडून करण्यात आले आहे.

मोटार वाहन कर न भरणे तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे ही वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. संबंधित वाहनांच्या मूळ मालकांना थकीत वाहन कर, दंड आणि इतर देय रक्कम भरण्याबाबत यापूर्वी तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप संबंधित वाहनमालकांनी थकीत रकमेचा भरणा केलेला नाही. तसेच वाहनांचाही ताबा घेतलेला नाही.

🔸पाच वाहनांचा भंगार स्वरूपात लिलाव

या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित पाच वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली आहे. वाहनमालक आणि ताबेदार यांनी कार्यालयीन प्रक्रियेची पूर्तता करून थकीत कर, दंड व अन्य देय रक्कम भरावी आणि विहित मुदतीत वाहनांचा ताबा घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

निर्धारित कालावधीत वाहनांचा ताबा न घेतल्यास कोणतीही पुढील सूचना न देता संबंधित वाहनांचा भंगार (स्क्रॅप) स्वरूपात जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव २३ ऑक्टोबर २०२६ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्यामार्फत www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येणार आहे.

त्यामुळे संबंधित वाहनमालक आणि ताबेदार यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन परिवहन कार्यालयाने केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!