डी आर कन्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साह साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित डि आर कन्या शाळांमध्ये आज मोठ्या उत्साहात सकाळ व दुपार विभागात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी ,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री एस आर शिंगणे होते. यावेळी मंचवर , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी , श्रीमती आर एस सोनवणे ,श्रीमती एस एस देवरे , श्री एस एस माळी ,जेष्ठ लिपीक श्री शाम पवार ,प्रमुख वक्ते सकाळ विभाग श्रीमती वाम एम पाटील, दुपार विभाग श्री के पी सनेर इ. मान्यवरांनी माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजा करून माल्यार्पण केले. या वेळी या महान विभूती बद्दल बोलतांना सर्वांना त्यांच्या कार्याचा गौरव केला. सर्व विद्यार्थ्यांनी आज वाचन करून हा दिवस साजरा करून नियमित वाचनाची शपथ घेतली. प्रमुख वक्ते यांनी मिसाईल व भारतीय प्रगतीविषयी सांगितले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर बंधू यांनी सहकार्य केले.