दिवाळी पूर्वीच अतिवृष्टी बाधितांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील तालुके शेतकऱ्यांना लाभचामिळणार दिलासा
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा अतिवृष्टी बाधितांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळणार असून, त्यांच्या अडचणींना थोडा दिलासा मिळेल.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देत न्याय्य तोडगा काढल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.