जाणताच पक्ष लढू अपक्ष आम्ही ऐंशी टक्के समाज कारण व वीसच टक्के राजकारण करण्याचे काम करीत असतो म्हणून त्याची चिंता मी करीत नाही. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून ठरवली आगामी दिशा.
भाग १-
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथेल अंबिका मंगल कार्यलय येथे नुकतीच शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र हिरालाल चौधरी (चेअरमन हिरा उद्योग समूह) हे होते.
पदाधीकार्यांशी सवांद साधताना मा. आ. शिरीष दादा यांनी सांगितले कि मागील पाच वर्ष माझा मतदार संघ विकास कामात मागे पडला आहे . त्याची उणीव आपल्याला दिसत आहे.
२०१४ ते २०१९ चा कामाचा आलेख जनते समोर आहे. हे सांगण्याची गरज नाही. आज मी माजी आमदार जरी झालो, तरी माझ्या परीने तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने विकास कामे आणण्याचा माझा प्रयत्न सुरूच आहे. ज्या पद्धतीने ग्रामीण भागात असो व शहरात असो. रस्ता, पथदिवे, च्या माध्यमातून विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. कोरोना काळात माय-बाप जनता जनार्दनाची सेवा आपण करण्याचा प्रयत्न केला त्यात मात्र राजकारण झाले रेमडीसिव्हरच्या नावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र एक गुन्हा काय शंभर गुन्हे दाखल झाले तरी अश्या गुन्ह्यांना मी भिक घालत नाही समाजाची सेवा करण हा माझा पिंड आहे. आम्ही ऐंशी टक्के समाज कारण व वीसच टक्के राजकारण करण्याचे काम करीत असतो म्हणून त्याची चिंता मी करीत नाही. मतदार संघातील जनताजनार्दनाचा आशीर्वाद व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साथ भक्कम पणे माझ्या पाठीशी आहे. व सदैव ती अशीच राहो अशी अपेक्ष्या व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकी साठी आपण सर्व जण कामाला लागून आपण केलेली विकास कामे व सामाजुउपयोगी कामे गावगावात घरा घरात मतदारांना पर्यंत पोहचवा वेळो वेळी ज्या वेळेस आपल्याला हाक देईल त्यावेळेस आपण आमच्या पाठीशी उभे रहा असे आव्हान शिरीषदादा चौधरी यांनी केले.
श्री. गुलाब पाटील यांनी मनोगतात कायर्कर्त्यांच्या भावना व्यक्त करत असताना सांगितले कीं गेल्या बारा वर्षापासून हा कार्यकर्ता खंबीरपणे मित्र परिवारा सोबत उभा आहे. त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानत कार्यकर्त्यांना सांगितले आता रडायचं नाही लढायचं आहे .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना श्री. रवींद बापू चौधरी यांनी सांगितले कि शिरीषदादा न विषयी विरोधक चुकीची वल्गना करत आहेत असे वल्गना करणारे बरेच बघितले वल्गना करणारे संपून पण गेले मात्र राम लक्ष्मणची जोडी आहे. सत्तर वर्षच काय सातशे वर्ष पण हि जोडी तुटणार नाही फुटणार नाही. कारण आपल्यासारखे बंधू ची साथ वरीस्थांचे आशीर्वाद व जनतेने दिलेले प्रेम हे माझ्या परिवारावर आहेत, हे मी कदापि विसरणार नाही कोण काय म्हणतो त्या कडे लक्ष न देता शिरीष दादा विजयी कसे होतील हेच काम आपल्याला आतापासून करायचं आहे. मागील दोन पंचवार्षिक पासून आपण सर्व जन दादांना सोबत आहात, व भविष्यात देखील राहाल यात तीळ मात्र शंका नाही. आपण शिरीष दादांच्या हाकेला साथ द्या हि विनंती केली.
प्रास्ताविक प्रवीण पाठक यांनी केले माजी पंचायत समिती पारोळा गोकुळ आबा चौधरी, गटनेते बबली दादा पाठक माजी नगरसेवक गुलाब भाऊ पाटील, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, पारोळा शेतकी संघ संचालक व म्हसवेचे सरपंच सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर संचालक शरद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर माजी संचालक शिवाजी आप्पा गोसावी, माजी पांडुरंग अण्णा महाजन, माजी नगरसेवक श्रीराम चौधरी, माजी नगरसेवक सलीम टोपी, माजी सरपंच मोहाडी रामचंद आबा माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन सर, वसंत नगर चे बबलू भाऊ जाधव, माजी नगरसेवक अवि भाऊ जाधव, नीमचे माजी सरपंच भास्कर चौधरी सर, माजी नगरसेवक बाळासाहेब संदानशिव, उत्तम वानखेडे, अधिकार सैंदाणे, माजी नगरसेवक कैलास भिल, महेंद्र भिल, प्रताप आप्पा पारधी, गुलाम नबी, आरिफ भाया, चंद्रकांत साळी, गोपीचंद आप्पा कोळी, माजी नगरसेवक संतोष लोहरे, माजी नगरसेवक महेश जाधव, विजय भोई, पंकज भोई, रमेश धनगर, मांडळचे जितू बापू पाटील, अक्षय अग्रवाल, दिनेश मणियार, मनोज शिंगाने संचालक हरी भिका वाणी, राकेश गुरव, नाना धनगर आदी उपस्थित होते.