मदनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन:महिलांची विशेष उपस्थिती
(निलेश गायकवाड)
भिगवण (मदनवाडी) ( दि.०८) जागतिक महिला दिनानिमित्त मदनवाडी ग्रामपंचायत व स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून मोफत महिला सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन बंडगरवस्ती येथे करण्यात आले होते.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. मदनवाडी परिसरातील महिलांनी शिबीरात विशेष उपस्थितीत राहून लाभ घेतला.

यावेळी मदनवाडी ग्रामपंचायत चे सरपंच सौ.आम्रपाली प्रकाश बंडगर ,उपसरपंच सौ.संगीता सतीश बंडगर ,सदस्य सुदर्शना थोरात ,तेजस देवकाते ,राजेंद्र देवकाते,रत्नमाला नरुटे,अर्चना वणवे,राजेश्री बंडगर,सोमनाथ गुरगुळे, रणजित निकम,लालासो कुंभार ,लक्ष्मी ढवळे ग्रामसेवक गाथाडे ,कर्मचारी विशाल सरक आदी.