लाखो ग्राहकांचा विश्वास जपत ‘एस एस मोबाईल’चा प्रथम वर्धापन दिन; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची मेजवानी अमळनेर : अमळनेर शहरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करत अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या एस एस मोबाईल शोरूमचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. भारतातील आघाडीच्या मोबाईल ब्रँड्स, दर्जेदार सेवा आणि ग्राहकाभिमुख व्यवहारामुळे एस एस मोबाईलने गेल्या एका वर्षात हजारो ग्राहकांचे प्रेम मिळवले आहे. वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलती, आकर्षक ऑफर्स आणि भेटवस्तूंची घोषणा करण्यात आली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भद्रा प्रतीक मॉल आणि भद्रा प्रतीक फर्निचरच्या यशस्वी वाटचालीनंतर संचालक आबासो (आबा) प्रताप साळी अण्णासाहेब दीपक साळी यांनी अमळनेरकरांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज एस एस मोबाईलची स्थापना केली. ग्राहकांचा प्रामाणिक विश्वास आणि प्रेम यामुळेच हे शोरूम आज यशस्वीपणे पहिल्या वर्षात पदार्पण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वर्धापन दिनानिमित्त संचालकांनी अमळनेर व परिसरातील सर्व ग्राहकांना शोरूमला भेट देऊन विशेष ऑफर्स, सवलती आणि आकर्षक भेटवस्तूंचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. “ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे बळ असून, भविष्यातही सर्वोत्तम सेवा आणि उत्तम गुणवत्ता देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू,” असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.