नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आंदोलनाला दौंड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-21 at 10.08.17 AM

नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आंदोलनाला दौंड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड- शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्या या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे वैज्ञानिक सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी व नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आंदोलनाला दौंड शहरातील नागरिक तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या पक्षाच्या वतीने दौंडचे तहसीलदार तुषार बोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले यामधे नीट पेपर लीक प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असून, या भूमिकेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि दौंडकर नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, निना जोसेफ, मनीषा संसारे, सारिका गरुड,संगीता मोरे, सिमरन खवळे, रमिला कातकडे, आनंद ओव्हाळ, कंचनमाला धिंडे, कालिका कांबळे, माधुरी ढवळे, रोहिणी ढवळे, सुनिता वांटे, जयश्री माने, थोरात मॅडम, हर्षदा पोते, तसेच शशांक गायकवाड, दिगंबर रिकीबे,अनिल धेंडे,संजय आयरेल्लू, अनिकेत रणसिंग, अभय भोसले, तात्या लोंढे, सागर भंडारी, दौंड भीमकन्या ग्रुपचे सर्व सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!