भाटनिमगाव माजी उपसरपंच कौशल्या दत्तात्रय वरपे यांचे दुःखद निधन
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव गावाचे माजी उपसरपंच कौशल्या दत्तात्रय वरपे यांचे दुःखद निधन झाले. आज दि. 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता भाटनिमगाव यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील काही वर्षपासून त्याच्यावर प्राथमिक उपचार व शस्त्रक्रिया झाल्याने आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचा अंत्यविधी त्याच्या गावात भाटनिमगाव यांच्या राहत्या घरी रानात करण्यात आला. आणि सावडण्याचा कार्यक्रम हा परवा दिवशी 22 तारखेला घेण्यात आला आहे.
वरपे कुटुंबाने नेहमी भाटनिमगाव मध्ये सामाजिक वा राजकीय क्षेत्रात नेहमी आपलें योगदान दिले आहे.तब्बल सलग 5 वर्षे उपसरपंच व 15 वर्षे सदस्य म्हणून त्यांच्या उपसरपंच काळात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यांच्या जाण्याने वरपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आज भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.