NEET परीक्षेत घवघवीत यश! देशात मुलींमध्ये पहिली आलेल्या श्रावणी कुदळेसह गुणवंत विद्यार्थ्यांचा रोटरी क्लबकडून विशेष सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-20 at 12.54.07 PM

NEET परीक्षेत घवघवीत यश! देशात मुलींमध्ये पहिली आलेल्या श्रावणी कुदळेसह गुणवंत विद्यार्थ्यांचा रोटरी क्लबकडून विशेष सन्मान

(निलेश गायकवाड)

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) उज्ज्वल यश संपादन करून आपल्या परिसराचे नाव देशभर उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोटरी क्लबच्या वतीने नुकताच अत्यंत दिमाखदार सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यामध्ये देशात मुलींच्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रावणी कुदळे हिचा विशेष सन्मानचिन्ह, आणि शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.याच सोहळ्यात NEET परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या अनुश्री थोरात, प्रणव टेंभुर्णे आणि समर्थ खनावरे या विद्यार्थ्यांचाही रोटरी क्लबच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प सदस्य मेघनाताई बंडगर व प्रमुख पाहुणे म्हणून भिगवणचे माजी सरपंच बापूराव थोरात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोटरी क्लबचे सचिव डॉक्टर प्रशांत चवरे यांनी सांगितले की, “NEET सारख्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परीक्षेत देशात अव्वल येणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. श्रावणीने व इतर विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण शहरासाठी व राज्यासाठी प्रेरणादायी आहे. तसेच अनुश्री, प्रणव आणि समर्थ यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे.”
सत्कारमूर्ती श्रावणी कुदळे हिने आपल्या मनोगतात सांगितले की, “हे यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला. तसेच जेवढे होता येईल तेवढे मोबाईल पासून दूर राहिल्यामुळे हे यश मिळाल्याचे सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले. रोटरी क्लबने केलेला हा सन्मान माझ्या पुढील वैद्यकीय प्रवासासाठी मोठी ऊर्जा देणारा आहे.”

या सत्कार सोहळ्यास रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ, संजय चौधरी, रियाज शेख, संपत बंडगर,औदुंबर हुलगे,अल्ताफ शेख, संजय खाडे, नामदेव कुदळे, कमलेश गांधी,केशव भापकर, योगेश चव्हाण, प्रसाद पाटील व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, शहरातील मान्यवर नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि रोटरी क्लब मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिन बोगावत यांनी मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या भावी वैद्यकीय शिक्षण व सेवेच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!