अमळनेर पोलिसांची कारवाई; चोरीच्या पल्सरसह संशयित जेरबंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260718-WA0203

अमळनेर पोलिसांची कारवाई; चोरीच्या पल्सरसह संशयित जेरबंद

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत चोरीच्या बजाज पल्सर मोटरसायकलसह एका संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 16 जुलै रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक शरद काकडीज, पोहेका मिलिंद सोनार, सुनील तेली, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे व विनोद संदानशिव हे शहरात पेट्रोलिंग करत असताना जुन्या बसस्थानक परिसरात चोरीच्या मोटरसायकलसह एक व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित युवकाला एमएच 19 ईसी 6846 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या लाल पट्टे असलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलसह ताब्यात घेतले. वाहनाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच वाहनाची कोणतीही कागदपत्रे सादर करू शकला नाही.

पुढील चौकशीत सदर मोटरसायकल जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 107/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल आहे. संशयिताचे नाव उमेश प्रदीप पाटील (वय 22, रा. पिंगळवाडे, ता. अमळनेर) असे असून त्याला चोरीच्या मोटरसायकलसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संशयिताकडून आणखी चोरीची वाहने हस्तगत होण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे.

अमळनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारी चोरीची वाहने किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!