पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चा 49 वा स्थापना दिवस उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात साजरा करीत संपन्न…
अमळनेर : विक्की जाधव.
पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचा 49 वा स्थापना दिवस (वर्धापन दिन) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. सकाळच्या मंगल प्रहरीच्या वातावरणात समस्त शाळेचे प्रांगण व मंच आकर्षक फुग्यांनी तोरणांनी व सुंदर आकर्षक पुष्प पाकळ्यांच्या रांगोळ्यांनी सज्जित करण्यात आला होता. शाळेच्या प्रांगणात सडा रांगोळ्या टाकून प्रवेशद्वाराजवळ स्वागत रांगोळ्या टाकून मान्यवर अतिथींचे पालकांचे अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात येत होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंतचे समस्त विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर अतिथी म्हणून शाळा पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष इंजिनिअर कमलेश जिजाबराव महाजन, सहसचिव ॲडव्होकेट मीनाक्षी विशाल राठोड हे होते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. शाळेचे मान्यवर शिक्षकांनी शाळेच्या गौरवशाली इतिहास व त्या कालखंडात सुवर्णमय स्वरूपात घडलेली कामगिरी या बाबींवर प्रकाशझोत टाकून अलंकारिक भाषेत मनोगत प्रकट केले. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेचे नाम फलक तयार केलेले कलाकृतीला फुग्याच्या माध्यमातून आकाशात सोडण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना एक जल्लोष करीत वर्धापन दिन चिरायू होवो अशा घोषणा देऊन आकाश निदादून सोडले. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना उपहार स्वरूपात पेढे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आकर्षक सजावट कलाकृती व परिसर सुशोभीकरण फलक लेखन कलाशिक्षक अनंत बागल यांनी केले प्रास्ताविक सूत्रसंचालन व्ही. जी. बोरोले यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य मार्गदर्शन शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी , व्ही.एस. अमृतकर, व्ही.पी .बडवे, प्रशांत वंजारी,अशोक महाजन, विनायक सूर्यवंशी, सविता पारधी, राजश्री पाटील, वाय. पी. ओवे, रोहन मुंदडा समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.