भिगवण सायकल क्लबची भिगवण ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण..

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-17 at 10.50.02 AM

भिगवण सायकल क्लबची भिगवण ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण..

(निलेश गायकवाड)

येथील भिगवण सायकल क्लबच्या सदस्यांनी दि. १६ रोजी भिगवण ते पंढरपूर असा ११५ किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण केला. यावेळी ‘सायकल चालवा तंदुरूस्त रहा’, ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश दिला. सायकल वारीचे हे यंदाचे नववे वर्ष होते. या सायकल वारीमध्ये ११ वर्षाच्या सार्थक चव्हाण या लहान मुलापासून ते ६८ वर्षाच्या सेवानिवृत्त मेजर भांडवलकर या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सदस्यांनी सहभाग नोंदवला.

पहाटे दोन वाजता निघालेली ही सायकल वारी भिगवण- इंदापूर -अकलूज या पालखी मार्गाने पंढरपूर या ठिकाणी सकाळी दहा वाजता पोहोच झाली.भिगवण सायकल क्लबच्या सदस्यांकडून अनेक सायकल राईड मध्ये सहभाग घेतला जातो. यातील अनेक सदस्य दोनशे किलोमीटर, शंभर किलोमीटर सायकलवर प्रवास करतात. सायकल चालवण्यामागे स्वतःचे आरोग्य चांगले राहावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी हा हेतू असून, याबरोबरच समाजामध्ये आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी हादेखील प्रमुख हेतू असतो.

या सायकल प्रवासामध्ये भिगवण येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पवार यांनी एका टेम्पोची सुविधा करून दिली होती. या सायकल सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल क्लबचे माजी अध्यक्ष संपत बंडगर, अल्ताफ शेख,नामदेव कुदळे, साहिल मुलानी यांनी सहभाग नोंदवला. या सायकल वारीमध्ये क्लबचे अर्जुन तोडेकर, केशव भापकर, संतोष सवाने, विजयकुमार हंगे, श्याम सातार्ले,औदुंबर हुलगे, योगेश चव्हाण, डॉ. भारत भरणे,कुलदीपक ननवरे, डॉ. अमित खानावरे,अथर्व दाताळ, डॉ. संकेत मोरे यांनी सहभाग नोंदवला. सायकल प्रवास यशस्वी पूर्ण केल्याबद्दल रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ, निखिल बोगावत व रियाज शेख यांनी या सर्वांचे स्वागत केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!