एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई; एक लाखांचा दंड वसूल

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-15 at 12.30.03 PM

एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई; एक लाखांचा दंड वसूल

बारामती,प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नाचे संरक्षण तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर नो-पार्किंग झोन परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत बारामती, भिगवण, दौंड आणि इंदापूर येथील विविध वाहनांवर कारवाई करून एकूण ₹१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

ही विशेष मोहीम दि. १० ते १४ जुलै २०२६ या कालावधीत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रतापजी सरनाईक यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक मा. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार करण्यात आली.

रा.प. पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्या नियंत्रणाखाली वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी विजय धनगर, बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे(वरिष्ठ),कुलदीप डुबल(कनिष्ठ), उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, तसेच नितीन घोडके, राज नरसगोंडे, चौधरी आणि ठेंगिल यांनी या संयुक्त मोहिमेत सहभाग घेतला.

मोहिमेदरम्यान एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर नो-पार्किंग झोनमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून एकूण ₹१,००,००० दंड वसूल करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या संयुक्त मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून पुणे विभागातील सर्व एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर नो-पार्किंग झोन परिसरात तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू राहील.

दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांना केवळ अधिकृत सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अवैध व धोकादायक प्रवासी वाहतुकीस प्रोत्साहन देऊ नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!