अमळनेरकरांनो सावध व्हा!. आपण पितोय ते दूध खरंच शुद्ध आहे कां.? 

अपनी भाषा में पढ़े! Translate

images (2)

अमळनेरकरांनो सावध व्हा!. आपण पितोय ते दूध खरंच शुद्ध आहे कां.? 

 

अमळनेर : विक्की जाधव.

दुधात युरिया, डिटर्जंटसह इतर घातक रसायनांची भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली असून, दोषींना १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दूध डेऱ्यांमुळे नागरिकांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. शहरात विक्री होणारे दूध व त्यापासून तयार होणारे मिठाईसह दुग्धजन्य पदार्थ दर्जेदार आहेत का, की त्यात भेसळीचा शिरकाव झाला आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरात अनेक नवीन दूध संकलन केंद्रे व डेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी त्यांची गुणवत्ता, दुधाची शुद्धता आणि नियमित तपासणी याबाबत ठोस माहिती समोर येत नाही. “आपण दररोज पित असलेले दूध आणि आपल्या मुलांच्या ताटात जाणारी मिठाई सुरक्षित आहे का?” हा प्रश्न आता प्रत्येक अमळनेरकराने स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्न सुरक्षा ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, अमळनेर शहर व तालुक्यात अद्याप भेसळ करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ठोस कारवाई झाल्याचे चित्र दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासह संबंधित यंत्रणांनी विशेष तपासणी मोहीम राबवून संशयित दूध डेऱ्या, मिठाई दुकाने व दुग्धजन्य पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. “शुद्ध अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, भेसळखोरांवर कठोर कारवाई ही काळाची गरज आहे,” अशी भावना अमळनेरकर व्यक्त करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!