पानातून व्यसनासाठी दिली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त; एकास अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-12 at 9.01.41 AM

पानातून व्यसनासाठी दिली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त; एकास अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

शिक्रापूर, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध व्यसनाच्या व्यवसायाविरोधात शिक्रापूर पोलिसांनी धडक कारवाई करत केंदूर येथील पहाडमळा परिसरातून पानामध्ये मिसळून विक्रीसाठी ठेवलेली संशयित अपायकारक पावडर जप्त केली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिक्रापूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक, दोन पंच, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मौजे केंदूर (पहाडमळा), ता. शिरूर येथे छापा टाकला.

WhatsApp Image 2026-07-12 at 9.02.06 AM

कारवाईदरम्यान तुषार राहुल पहाड (वय २६, रा. पहाडमळा, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या घरामागील पत्राशेडची झडती घेतली असता, लाल रंगाच्या टेबलावरील बॉक्समध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेली पानामध्ये मिसळून सेवनासाठी वापरली जाणारी उग्र वासाची संशयित पावडर आढळून आली. ही पावडर व्यसनासाठी वापरली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळीच प्राथमिक तपासणी केली. पंचांसमक्ष संशयित पावडर जप्त करण्यात आली. त्यापैकी १० ग्रॅमचे दोन नमुने रासायनिक विश्लेषणासाठी स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आले, तर उर्वरित ८५ ग्रॅम पावडरही नियमानुसार सील करून ताब्यात घेण्यात आली.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तत्काळ अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जप्त केलेला माल पुढील तपासासाठी रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असून शिक्रापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp Image 2026-07-12 at 9.02.17 AM

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार धनंजय थेऊरकर आणि विशाल देशमुख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन –
“खायच्या पानामधून व्यसनासाठी अपायकारक पदार्थांचा वापर करून मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध व्यवसायाविरोधात शिक्रापूर पोलीस कठोर कारवाई करतील. अशा प्रकारची माहिती नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.”
— चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!